Connect with us

मराठी कलाकार

उमेश कामत आणि प्रिया बापट देणार गुड न्यूज…

Gossips

उमेश कामत आणि प्रिया बापट देणार गुड न्यूज…

सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असणारी मराठीतील गोड जोडी म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच दोघे फॅन्सशी संवाद साधतात. आपले फोटो, व्हिडीओ आणि सिनेमाची माहिती सोशल मीडियावर शेअर करतात. मात्र यावेळी दोघांनी शेअर केलेली बातमी काही औरच आहे. ‘एक गोड बातमी आहे’ या कॅप्शनसह प्रियाला मिठी मारतानाचा सुंदर आणि रोमँटिक फोटो या पोस्टमध्ये पाहायला मिळत आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच फॅन्सकडून आणि चित्रपटसृष्टीतील त्यांच्या सहकाऱ्यांकडून दोघांवर शुभेच्छा आणि अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. प्रिया आणि उमेशच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार असल्याच्या चर्चा या पोस्टमुळे सुरू झाल्या आहे.

लवकरच उमेश कामत पत्नी प्रिया बापट हि रियल लाईफ जोडी एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. उमेशने दोघे एकत्र काम करत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले असले तरी अद्याप या चित्रपटाची कथा व शीर्षक समजू शकलेले नाही. दोघा नवराबायकोने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. प्रियाने मराठी आणि हिंदी सिनेमा, मालिकांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत. दुसरीकडे उमेशचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. त्यानेही आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर जादू केली आहे.

Comments

More in Gossips

Like Us on Facebook

Popular Posts

To Top