Connect with us

मराठी कलाकार

बघायलाच हवा असा हॉरर,थ्रिलर आणि प्रथम मराठी सायफाय सिनेमाचा ट्रेलर.

Movie Trailers

बघायलाच हवा असा हॉरर,थ्रिलर आणि प्रथम मराठी सायफाय सिनेमाचा ट्रेलर.

लव्हस्टोरी अथवा एक्शन मुव्हीच्या पलीकडे विचार करून विज्ञानाच्या परिघातील आगळा-वेगळा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं धाडस बॉलिवूड किंवा मराठी निर्माते करताना दिसत नाहीत अशी नेहमीच ओरड ऐकायला मिळते.मात्र मराठी चित्रपटांमध्ये आजपर्यंत कधीही चित्रित न केल्या गेलेल्या अशा फाईट्स, अंडरवॉटर सीन्स आणि स्पेशल इफेक्ट्स एका आगामी सिनेमामध्ये प्रेक्षकांना पहायला मिळतील. सिनेमाचं नाव उन्मत्त असं असून सिनेमा सायफाय, हॉरर, सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील आहे. सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला असून त्यात घडणाऱ्या घटनांची योग्य हाताळणी आपल्याला बघायला मिळते आहे.

अस्सल विज्ञानकथेवर आधारित ‘उन्मत्त’ हा सिनेमा एक अनोख्या विषयाला हात घालतो. स्लीप पॅरलिसिस च्या संकल्पनेवर चित्रपटाचं कथानक उभं असून, आजच्या तरुण पिढीचं कुतूहल जागविणारा, वैज्ञानिक विचारधारेला दुजोरा देणारा हा सिनेमा आहे. चित्रपटाची निर्मिती राजेंद्र खैरे यांची असुन, चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन महेश राजमाने यांनी केले असुन चित्रपटात आरुषी, विकास बांगर, पूर्णिमा दे, प्रसाद शिक्रे, संदीप श्रीधर व संजय ठाकूर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

इंजिनिअर्स, डॉक्टर्स आणि अनेको शास्त्रज्ञांची भुमी असणाऱ्या भारतात ना साहित्यामध्ये विज्ञान कथा आढळतात ना चित्रपटांमध्ये. सायन्स फिक्शनचा आनंद भारतीय प्रेक्षकांना मिळत नाही. नेमक्या या कमतरेच्या फायदा घेत हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीने प्रेक्षकांना दर्जेदार इंग्रजी चित्रपटांच्या मोहजालात अडकवलं आहे. मात्र त्याला मात द्यायला बॉलिवूडसह मराठी इंडस्ट्री पण या सिनेमाच्या निमित्ताने रेडी झाल्याचं जाणवत आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Movie Trailers

Like Us on Facebook

Popular Posts

To Top