Connect with us

मराठी कलाकार

१ मराठी चित्रपट आणि तब्बल ५ वेगवेगळ्या भाषांतील गाणी.मराठी सिनेमांतील नवा विक्रम

News

१ मराठी चित्रपट आणि तब्बल ५ वेगवेगळ्या भाषांतील गाणी.मराठी सिनेमांतील नवा विक्रम

मनाने तरुण असणारा प्रत्येकजण कधी ना कधी आपली ‘कॉलेज डायरी’ उघडून त्यात रममाण होत असतो. कारण, तरुणाईच्या हृदयातला हळवा कोपरा म्हणजे ‘कॉलेज’… जिद्द, मैत्री, धम्माल-मस्ती यातून आलेला बेदरकारपणा म्हणजे ‘कॉलेज’… आयुष्याच्या प्रत्येक वळणाला आव्हान देणं म्हणजे ‘कॉलेज’ आणि या साऱ्यांची सरमिसळ म्हणजे ‘कॉलेज डायरी’ असते. अशीच एक कॉलेजची कथा सांगणारा ‘कॉलेज डायरी’ १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भावेश काशियानी फिल्म्स,आयड्रिम्झ फिल्मक्राफ्ट प्रस्तुत आणि अनिकेत जगन्नाथ घाडगे दिग्दर्शित ‘कॉलेज डायरी’ या मराठी चित्रपटाचे संगीत अनावरण प्रसिद्ध गायक बेन्नी दयाल यांच्या हस्ते करण्यात आला.

यात विशेष बाब म्हणजे पाच भाषेतील आणि त्या-त्या भाषांमधील सुप्रसिद्ध गायकांच्या सुरेल स्वरांनी सजलेली ‘कॉलेज डायरी’ मधील ही गाणी म्हणजे रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.‘बत्तमीज दिल’, ‘बँग बॅंग’, ‘पप्पू कान्ट डान्स’, ‘डिस्को डिस्को’ यांसारख्या पार्टी सॉंग्सवर साऱ्यांना नाचवणारे बेन्नी दयाल तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. ‘कॉलेज डायरी’ मध्ये ‘कोरंगु पट्टू’ या तामिळ गीताला त्यांनी स्वरसाज चढवला असून अश्विन यांचे शब्द आहेत तर या गाण्याला रेवा यांचे संगीत लाभले आहे. मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्लिश आणि तामिळ अशा पाच भाषांमध्ये गायलेल्या या गाण्यांच्या निमित्ताने मराठीत पहिल्यांदाच एक यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.

‘कॉलेज डायरी’ या चित्रपटात विशाल सांगळे, आनंद बुरड, समीर सकपाळ, वैष्णवी शिंदे, शरद जाधव, प्रतीक्षा शिवणकर, शिवराज चव्हाण, अविनाश खेडेकर, प्रतीक गंधे, शुभम राऊत, हेमलता रघू, जनार्दन कदम, आदींच्या भूमिका आपल्याला पाहता येतील. सध्या ‘कॉलेज डायरी’ मधील गाणी विविध सोशल पोर्ट्लसवर उपलब्ध असून तुम्ही त्यांचाआनंद घेऊ शकता. १६ फेब्रुवारीला ‘कॉलेज डायरी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

To Top