Connect with us

मराठी कलाकार

मच अवेटेड “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर”च्या टिझरला रसिकांचा जोरदार प्रतिसाद.

Featured

मच अवेटेड “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर”च्या टिझरला रसिकांचा जोरदार प्रतिसाद.

१९६० च्या दशकातील एका महान कलावंताची हि गोष्ट. ज्यांचा प्रवेश होताच नाट्यगृह टाळ्यांच्या कडकडाटात दणाणून जायचे ते मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांची. त्यांच्या जीवन प्रवासावर आधारित आगामी “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर” सिनेमाचं टिझर नुकताच सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सुबोध भावे, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, मोहन जोशी, आनंद इंगळे यांच्या सिनेमात भूमिका आहेत. डॉ काशिनाथ घाणेकरांची भूमिका सुबोध भावे साकारत आहे.

टीझरच्या सुरुवातीलाच मराठी नाटकातील दिग्गज कलावंतांचं आपल्याला दर्शन होतं. वसंत कानिटकर, भालजी पेंढारकर, श्रीराम लागू, सुलोचना दीदी, मास्टर दत्ताराम यांची झलक आपल्याला बघायला मिळते. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. मराठी रंगभूमीचा चेहेरामोहराच त्यांनी बदलून टाकला होता. प्रस्तुत “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर” सिनेमाचा टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला असून सुबोध भावेची भूमिका रंजक निर्माण करणार असल्याचं दिसतंय.

अभिजीत देशपांडे दिग्दर्शित “आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर” दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Featured

Like Us on Facebook

Popular Posts

To Top