Connect with us

अवघ्या शंभर रुपयांत हे झाले सिनेमाचे सहनिर्मातेे। अपकमिंग सिनेमा स्पेशल ‘बबन’

baban marathi movie

Upcoming Movies

अवघ्या शंभर रुपयांत हे झाले सिनेमाचे सहनिर्मातेे। अपकमिंग सिनेमा स्पेशल ‘बबन’

खुप मेहनतीने एखादी गोष्ट केली आणि मग ती फळाला आली तर आनंदाला आणि उत्साहाला पारावर राहत नाही. आता हेच बघा ना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवलेला ‘ख्वाडा’ हा भाऊराव कऱ्हाडे दिगदर्शित सिनेमा. आर्थिक तुटवड्यामुळे त्यांची चित्रपट दिगदर्शित करण्याची इच्छा अपूर्ण राहत होती पण भाऊसाहेबांनी स्वतःची शेतजमीन विकून ‘ख्वाडा’ प्रेक्षकांसमोर सादर केला. आणि तो सगळ्यांचा पसंतीसही पडला. चित्रपट महोत्सवाला आलेल्या लाखो प्रेक्षकांनी ‘ख्वाडा’लाच पसंती दिली होती. अश्याच प्रेक्षकांपैकी दोन प्रेक्षक मनोहर मुंगी आणि जोशी काका ह्यांना सिनेमा खुपच आवडला. त्यांनी बक्षिस म्हणून 100 रुपये भाऊसाहेबांना दिले. आणि आणि ह्याच कौतुकाने उत्साहित भाऊसाहेबांना ‘बबन’ हा सिनेमा सुचला.

baban marathi movie

यावर भाऊसाहेब म्हणाले कि मी ते पैसे घेत नव्हतो पण त्यांनी आम्ही हे पैसे तुला खाऊ खायला दिले नाही तर पुढच्या सिनेमाच्या निर्मितीमध्ये वापर असं सांगितलं होतं. प्रेक्षकांचा आशीर्वाद समजून भाऊसाहेबांनी ते घेतले. आणि आता त्यांच्या पुढच्या सिनेमात ‘बबन’मध्ये त्यांनी श्रेयाचा वाटा म्हणून या दोन्ही प्रेक्षकांचा सन्मान केला आहे. सिनेमाच्या क्रेडिट लिस्ट मध्ये ह्या दोघांची नावे झळकली आहेत. येत्या 23 मार्चला ‘बबन’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. मागील सिनेमा बघता आता भाऊसाहेबांकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आणि त्या भाऊसाहेब नक्की पूर्ण करतांना आपल्याला दिसतील.

Comments

comments

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in Upcoming Movies

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top