Connect with us

मराठी कलाकार

कलाकारांचे चेहरे लपवलेलं “हे”पोस्टर कुठल्या सिनेमाचं?घ्या जाणून.

Featured

कलाकारांचे चेहरे लपवलेलं “हे”पोस्टर कुठल्या सिनेमाचं?घ्या जाणून.

शालेय शिक्षणातील शेवटचं पण अत्यंत महत्वाचं वर्ष म्हणजे दहावीचं वर्ष या तणावाखाली पालकं आणि विद्यार्थी वावरत असतात.१० वीची परीक्षा म्हटलं की बहुतांशी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पोटात गोळा येतो. मुलगा किंवा मुलगी १० वी इयत्तेला असणं ही पालकांसाठीही एक परीक्षाच असते. दिवसागणीक वाढणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्या पाल्याने जिंकावं यासाठी आई-वडीलही कंबर कसतात. दरम्यान, याच महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या आणि तणावपूर्ण अशा ‘१० वी’ परीक्षेवर भाष्य करणारा एक चित्रपट येऊ घातला आहे. ‘१० वी’ असं या चित्रपटाचं नाव असून, या निमित्ताने १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांना पुन्हा एकदा दहावी इयत्तेचा, त्यावेळेच्या वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.

‘१० वी’ चित्रपटाचं एक पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं असून, ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘तुम्हाला तुमच्या १० वी ची आठवण करुन देण्यासाठी लवकरच हा चित्रपट घेऊन येत आहोत’, अशी घोषणा १० वी चित्रपटांच्या निर्मात्यांनी केली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांच्या १० वीच्या टेन्शनचा खात्मा करण्यासाठी या चित्रपटाची निर्मीती करण्यात आल्याचं निर्माते आणि दिग्दर्शकांचं म्हणणं आहे.

महत्वाची बाब म्हणजे चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मात्र कलाकारंचे चेहरे लपवण्यात आले आहे.मयूर राऊत आणि पियुष राऊत यांनी ‘१० वी’ दिग्दर्शिन केलं आहे. रविराज पवार व आकाश पवार यांच्या गीतांवर संगीतसाज चढविला आहे. अरुण चिल्लारा, आकाश पवार आणि ऐश्वर्य मालगावे यांनी. छायांकन मनोज सी कुमार यांचे असून पराग खाऊण्ड यांनी संकलकाची भूमिका पार पाडली आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Featured

To Top