Connect with us

मराठी कलाकार

प्रियदर्शन जाधव आणि अनिकेत विश्वासरावची जोडी लवकरच झळकणार एकत्र.

Upcoming Movies

प्रियदर्शन जाधव आणि अनिकेत विश्वासरावची जोडी लवकरच झळकणार एकत्र.

लवकरच प्रियदर्शन जाधव आणि अनिकेत विश्वासराव हा जोडगोळी पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. आगामी ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ सिनेमाच्या माध्यमातून हे दोघे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. या सिनेमात भाग्यश्री मोटे, प्रिया गमरे, अंशुमन विचारे, भारत गणेशपुरे, पदम सिंग, सुरेश पिल्लई, स्वाती पानसरे, अनुपम ताकमोघे यांच्या प्रमुख भूमिका असून नुकतंच सिनेमातील पहिले धम्माल गाणे ‘तू हात नको लाऊ’ मुंबईमध्ये धूमधडाक्यात प्रदर्शित करण्यात आले आहे.

झी म्युझिकने हे गाणे प्रदर्शित केले आहे व ह्या गाण्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद सध्या मिळत आहे. हिंदी व मराठी अशा दोन्ही सिनेसृष्टीमध्ये अनेक अभिनेत्यांच्या जोड्या जशा हिट ठरल्या आहेत तसंच अनिकेत-प्रियदर्शन अशी नवीन जोडगोळी मराठी सिनेसृष्टीला मिळाली आहे असं म्हणायला आता काही हरकत नाही. राजकला मुव्हीज अँड बाबा मोशन पिक्चर्स प्रा. लि.या बॅनरखाली निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा २३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Upcoming Movies

Like Us on Facebook

Popular Posts

To Top