Connect with us

मराठी कलाकार

वास्तववादी स्पर्श असलेला आगामी “पाटील”.

Upcoming Movies

वास्तववादी स्पर्श असलेला आगामी “पाटील”.

मराठी सिनेरसिकांनी समाजवास्तव मांडणाऱ्या सिनेमांवर नेहमीच प्रेम केलं आहे. अशीच एक वास्तववादी कथा घेऊन आगामी मराठी सिनेमा “पाटील” आपल्या भेटीस येणार आहे. एका तरुणाच्या आयुष्याची, त्याने केलेल्या परिश्रमाची कथा “पाटील” सिनेमात मांडण्यात आली आहे. संतोष मिजगार दिग्दर्शित ह्या सिनेमात शिवाजी लोटन पाटील, वर्ष दंदाळे, भाग्यश्री मोठे, नरेंद्र देशमुख हि मंडळी अभिनय साकारत आहे.

सदर सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ह्यावेळी सिनेमाला शुभेच्छा देत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिनेमाच्या दिग्दर्शकांचं कौतुक केलं. सिनेमात एकूण पाच गाणी असून त्यातील “पाटील पाटील” हे गाणं आदर्श शिंदे आणि आनंद शिंदेनी गायलं आहे. सिनेमाला रोमँटिक टच सुद्धा असून त्यातील “तुला पाहून” हे रोमँटिक गाणं सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Upcoming Movies

To Top