Connect with us

मराठी कलाकार

पु.लं च्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘भाई-व्यक्ती कि वल्ली’. पहा टिझर

Featured

पु.लं च्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘भाई-व्यक्ती कि वल्ली’. पहा टिझर

महाराष्ट्राचे भूषण असे लेखक, अभिनेते, गायक, दिग्दर्शक, संगीतकार, बहुआयामी व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा रसिकांना बघावयास मिळणार आहे. आजच सिनेमाचा टिझर आऊट झाला असून त्या दशकांतील छटा आपल्याला टिझरमधून अनुभवण्यास मिळते आहे. सिनेमाचं नाव ‘भाई-व्यक्ती कि वल्ली’ असून सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन महेश मांजरेकर करीत आहेत.

पु.लं च्या अजरामर कलाकृतींवर अनेक नाटकं रंगभूमीवर आली असून सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच पु.लं पाहण्यास मिळणार आहेत. भाईंच्या जीवनातील महत्वपूर्ण गोष्टींवर या सिनेमाद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे. ‘डॉ. काशिनाथ घाणेकरां’नंतर महान मराठी कलाकाराच्या आयुष्यावर आधारित हा दुसरा सिनेमा आहे. सिनेमात पु.लं ची भूमिका ‘वाय झेड’ फेम अभिनेता सागर देशमुखने साकारली असून सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षेने साकारली आहे. पुढील वर्षात म्हणजे ४ जानेवारी २०१९ रोजी ‘भाई-व्यक्ती कि वल्ली’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Comments

More in Featured

To Top