Connect with us

मराठी कलाकार

तगडी स्टारकास्ट असलेला “मी शिवाजी पार्क” अडकला सेन्सॉरच्या कात्रीत.

Upcoming Movies

तगडी स्टारकास्ट असलेला “मी शिवाजी पार्क” अडकला सेन्सॉरच्या कात्रीत.

“न्यायदेवता आंधळी असते…आम्ही डोळस होतो.” या शीर्षकाखाली निर्माता दिग्दर्शक अभिनेते महेश मांजरेकर यांचा “मी शिवाजी पार्क” लवकरच प्रदर्शित होणार आहे.  केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय असलेले दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम हे दिग्गज कलावंत “मी शिवाजी पार्क” या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सोबत शरद पोंक्षे, उदय टिकेकर, सविता मालपेकर, सुहास जोशी आणि भारती आचरेकर हे ज्येष्ठ कलावंतसुद्धा या चित्रपटात आहेत. १८ ऑक्टोबर रोजी सिनेमाची नियोजित प्रदर्शनाची तारीख असून अद्यापही सेन्सॉरकडून हिरवा कंदील मिळालेला नाही.

“मी शिवाजी पार्क”मधील एका वाक्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला असून सेन्सॉरने आक्षेपार्ह म्हटलेलं वाक्य काढणार नाही असा पवित्रा निर्मात्यांनी घेतला आहे. ‘या चित्रपटात आक्षेपार्ह असं काहीच नाही. कायद्याचं उल्लंघन होईल असा कोणताच संवाद नाही. चित्रपटात जे काही संवाद आहेत, ते दाखवणं गरजेचं आहे,’ असं मत एका वृत्तवाहिनीशी बोलताना निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मांडले आहे. प्रस्तुत सिनेमाला अजित परब यांचं संगीत लाभलं असून वैभव जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी ते शब्दबद्ध केलं आहे. आता सेन्सॉरकडून सिनेमाला ग्रीन सिग्नल मिळून तो १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार का? हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.

Continue Reading
Advertisement
You may also like...
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Upcoming Movies

To Top