Connect with us

मराठी कलाकार

बॉईज २ चा ट्रेलर: मजा आणि धमाल करत मिळवतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद

Movie Trailers

बॉईज २ चा ट्रेलर: मजा आणि धमाल करत मिळवतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद

बॉईज १च्या यशानंतर आता निर्माते सिनेमाच्या सिक्वेल कडे निघाल्याचं बघायला मिळतंय. नुकताच बॉइज २ चा ट्रेलर लॉन्च झाला असून सिनेमा चांगलाच धुमाकूळ करणार असं दिसतंय. विशाल देवरुखकर दिग्दर्शित सिनेमाच्या पहिल्या भागातील ‘आम्ही लग्नाळू’ गाण्याने सर्वानाच वेड लावलं होतं. सिनेमाचा पहिला भाग जरी कॉमेडी जॉनर मध्ये येत होता पण बॉईज २ मध्ये मात्र भरपूर मसाला भरलेला आपल्याला ट्रेलरमधून दिसतो. नुकताच सोशल नेटवर्क साईट वर सिनेमाचा भन्नाट ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे.

सिनिअर्स आणि ज्युनिअर्स कॉलेजकुमारांचा धुमाकूळ आपल्याला सिनेमात बघायला मिळणार आहे. सिनेमात आपल्याला सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक काळोखे, सायली पाटील, यतीन कार्येकर, शर्वरी जमेनीस, जयवंत वाडकर, किशोरी आंबिये अशी भली मोठं स्टार कास्ट बघायला मिळणार आहे. यानिमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर रसिकांना मराठी सिनेमात एक तगडी कॉलेजवयीन कथा पाहायला मिळणार आहे.

विशाल देवरुखकर दिग्दर्शित बॉईज २ आपल्याला ५ ऑक्टोबर पासून सिनेमागृहात भेटीस येत आहे.

Comments

More in Movie Trailers

To Top