Connect with us

मराठी कलाकार

अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा सोबत! निमित्त आगामी सिनेमा “अबलख”.

Actor

अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा सोबत! निमित्त आगामी सिनेमा “अबलख”.

स्वप्ने माणसाला जगायला शिकवतात. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अनेक जण धडपड करत असतात. याच स्वप्नपूर्तीच्या धाटणीवर अबलख सिनेमात आपल्याला चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे एकत्र आहेत. आनंद शिवाजी चव्हाण दिग्दर्शित अबलख या सिनेमात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्वप्नांसाठी धडपडणाऱ्या चार मित्रांची कथा ‘अबलख’ या सिनेमात दाखवण्यात आली आहे.

 

प्रस्तुत सिनेमाची निर्मिती श्री तुळजाभवानी प्रसन्न फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे. आयुष्याच्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांना योग्य प्रकारे तोंड देऊन प्रवास सुखकर कसा करता येईल याचे चित्रीकरण सिनेमात मांडण्यात आले आहे. सिनेमातील प्रार्थना व अनिकेत यांच्या भूमिकेबद्दल अद्याप समजलेले नसले तरीही मात्र या जोडीला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. याआधी ‘मस्का’ सिनेमात दोघांनी एकत्र काम केले होते.

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in Actor

To Top