Connect with us

मराठी कलाकार

‘अमलताश’ आगामी सिनेमाचा टिझर.

Actor

‘अमलताश’ आगामी सिनेमाचा टिझर.

बालगंधर्व, पुष्पक विमान या दोन सिनेमात शास्त्रीय गायक राहुल देशपांडेने कॅमिओ भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत राहुल देशपांडे सिनेमात झळकणार आहे. अमलताश असं या सिनेमाचं नाव असल्याचं कळतं आहे. या सिनेमाचा टीझर लाँच झाला असून संगीताने भरलेल्या ‘अमलताश’ या सिनेमात आपल्याला राहुलचा अभिनय पाहायला मिळणार आहे.

‘अमलताश’ हा सिनेमा कलाकाराच्या आयुष्याभोवती फिरतो. शास्त्रीय संगीताकडे आजच्या तरूणाईला वळवण्यात गायक राहुल देशपांडेचा मोठा वाटा आहे. शास्त्रीय गायनाच्या मैफीली, संगीत नाटकानंतर आता तो सिनेमात पदार्पण करत आहे. सिनेमाच्या पोस्टरमुळे उत्सुकता आणखी वाढली असून सदर सिनेमात राहुलसोबत त्याची बहीण दीप्ती देखील झळकणार आहे. यंदा ‘मामि’ फिल्म फेस्टिवल्ससाठी ‘अमलताश’ हा आगामी सिनेमा निवडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Comments

More in Actor

To Top