Connect with us

मराठी कलाकार

अभिनेता गश्मीर महाजनीने शेअर केलं पोस्टर.”एक राधा एक मीरा” आगामी सिनेमा.

Upcoming Movies

अभिनेता गश्मीर महाजनीने शेअर केलं पोस्टर.”एक राधा एक मीरा” आगामी सिनेमा.

प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी मीडियावर काहीसा ऍक्टिव्ह असतो. नुकतंच त्याने त्याच्या सोशलमिडीया हॅन्डल वरून आगामी सिनेमाचे पोस्टर लॉन्च केले आहे. “एक राधा एक मीरा” असं सिनेमाचं नाव असून, सिनेमाच्या पोस्टरमध्ये आपल्याला सिनेमातील मुख्य दोन स्त्रीपात्रे पाहायला मिळतात. अहलेज् मूवी मॅजिक आणि महेश मांजरेकर फिल्म्सचे सादरीकरण असलेलय ह्या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत.

“प्रेमाच्या अलीकडची, मैत्रीच्या पलीकडची गोष्ट “एक राधा एक मीरा” येतेय “२३ नोव्हेंबर” ला…” असं पोस्टर शेअर करतांना कॅप्शन मध्ये गश्मीरने लिहिलं आहे. सिनेमात आपल्याला गश्मीर सोबतच मृन्मयी देशपांडे, सुरभी भोसले मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सिनेमाला विशाल मिश्रा यांचं संगीत असून सिनेमाची निर्मिती अविनाशकुमार अहले करीत आहेत. पोस्टरमध्ये दर्शविल्याप्रमाणे सिनेमा येत्या २३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Upcoming Movies

To Top