Connect with us

मराठी कलाकार

सत्य घटनेवर आधारित ‘टेक केअर गुड नाईट’! आगामी सिनेमा विशेष. पहा ट्रेलर

Movie Teaser

सत्य घटनेवर आधारित ‘टेक केअर गुड नाईट’! आगामी सिनेमा विशेष. पहा ट्रेलर

मराठी सिनेमात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आयचा घो,हापूस, आयडीयाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही, टाइम प्लीज, मुंबई पुणे मुंबई – २, आम्ही दोघी या काही हिट मराठी चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने केली आहे. अनेक मराठी चित्रपटांची निर्मितीत अग्रणीत असलेल्या एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची आणखी नवी कलाकृती आता लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि एस पी एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे, आदिनाथ कोठारे आणि पर्णा पेठे यांच्या मुख्य भुमिका आहेत.

सिनेमात आजच्या तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जीवनशैलीचे अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. एका सायबर गुन्हेगाराविरोधात शहरातील कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी दिलेलया लढ्याभोवती चित्रपटाचं कथानक फिरतं. सत्य कथानकावर आधारित असलेल्या ह्या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक गिरीश जोशी आहेत. चित्रपटाची निर्मिती हिमांशू पाटील आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास ‘टेक केअर गुड नाईट’ सज्ज झाला आहे.

Comments

More in Movie Teaser

To Top