Connect with us

मराठी कलाकार

उर्मिला मातोंडकर आणि सोनाली कुलकर्णी प्रथमच एकत्र.”माधुरी” सिनेमाचा फर्स्ट लूक.

Upcoming Movies

उर्मिला मातोंडकर आणि सोनाली कुलकर्णी प्रथमच एकत्र.”माधुरी” सिनेमाचा फर्स्ट लूक.

मराठी सिनेमाचे नेहमीच बॉलिवूड किंवा इतर प्रादेशिक मनोरंजन उद्योगांकडून नेहमीच कौतुक होत आलेले आहे. मराठी कलाकारांचा तगडा अभिनय, आणि त्यासाठी लागणाऱ्या संपन्न अश्या कथा हेच कदाचित ह्या यशामागील गमक असावं. बॉलिवूडकरांनाही हल्ली मराठी सिनेमाचं वेड लागलेलं दिसतंय. सलमान खान, जॉन अब्राहम, अजय देवगण, माधुरी दीक्षित अशा एक ना अनेक दिग्गज ताऱ्यांनी या ना त्या प्रकारे मराठीत काम केलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता यात आणखी मोठी भर पडणार आहे ते आगामी सिनेमा “माधुरी” च्या निमित्ताने. सुरुवातीस आलेल्या बातमीनुसार ह्यात केवळ बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची भूमिका आहे असं माहिती होतं, पण तिच्या साथीला सिनेमात अष्टपैलू अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचीही भूमिका आहे.

उर्मिला मातोंडकर आपल्याला टायटल रोल मध्ये दिसेल असं सुरुवातीस सर्वाना वाटलं होतं, पण सिनेमात सोनाली कुलकर्णी आपल्याला टायटल रोल मध्ये दिसणार आहे. एक सुंदर संदेश असणारा सिनेमा असून निःसंशयपणे, या सिनेमामुळे उर्मिला आणि मराठी प्रेक्षकांमधील प्रेमळ संबंध बळकट होतील. सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच लॉन्च करण्यात आला असून  “माधुरी”च्या निमित्ताने लवकरच रसिकांना उर्मिला मातोंडकर आणि सोनाली कुलकर्णीच्या अभिनयाची मेजवानी एकत्र मिळणार आहे. ३० नोव्हेंबरला सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Comments

More in Upcoming Movies

To Top