Connect with us

मराठी कलाकार

‘रंगीला गर्ल’ अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा मराठी सिनेमा ‘माधुरी’.

News

‘रंगीला गर्ल’ अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा मराठी सिनेमा ‘माधुरी’.

अनेक वर्ष बॉलीवुड गाजवणारी, रसिकांकडून रंगीला गर्ल, मासूम गर्ल अशी अनेक नावं मिळवणारी लाडकी अभिनेत्री म्हणजे उर्मिला मातोंडकर. बॉलीवुड जगत अनेक वर्ष गाजवल्यानंतर लवकरच उर्मिला मातोंडकर पुन्हा एकदा स्वघरी परततेय. मराठी रुपेरी पडद्यावर उर्मिला दुस-यांदा एंट्री करणार असून, तिच्या ‘माधुरी’ या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली आहे. बिझनेसमन आणि मॉडेल असणारे मोहसिन अख्तर मीर आपल्या मराठमोळ्या पत्नीचा मराठी चित्रपट निर्मित करत आहेत.

उर्मिला मातोंडकरचे पती मोहसिन अख्तर मीर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत निर्मितीविषयी काहीही अनुभव नसताना देखील मराठी मातीतील कथा, मराठी कलाकारांचे अभिनय कौशल्य आदी गोष्टींमुळे ‘माधुरी’ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा त्यांनी निर्णय पक्का केला. हल्ली कलाकारांच्या नावाचा वापर करुन सिनेमाला शीर्षक देण्याचा ट्रेंड असून आता यात माधुरी सिनेमाची भर पडली आहे. या चित्रपटात उर्मिला मातोंडकरने कोणती भूमिका साकारली आहे याविषयीची माहिती जरी अद्याप कळू शकली नसली तरीही ‘माधुरी’ चित्रपट प्रेक्षकांसाठी एक निखळ आणि अर्थपूर्ण मनोरंजनाची मेजवाणी असेल हे नक्की!

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top