Connect with us

मराठी कलाकार

बिगबॉस मराठी नंतर “ह्या”मालिकेत झळकणार आऊ उषा नाडकर्णी.

News

बिगबॉस मराठी नंतर “ह्या”मालिकेत झळकणार आऊ उषा नाडकर्णी.

‘बिग बॉस’ या रिएलिटी शोनंतर महाराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. हो! कलर्स मराठी वाहिनीवरील ‘घाडगे & सून’ मालिकेत त्या आपल्याला आता दिसणार आहेत. त्या कोणत्या भूमिकेत दिसणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहेत.

उषा नाडकर्णी बिग बॉसच्या घरानंतर आता घाडगे सदनमध्ये दाखल होणार आहेत. ‘घाडगे & सून’ मालिकेत मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे आणि त्याचवेळेस माईंची चुलत सासू घाडगे सदनामध्ये येणार आहे. या चुलत सासूच्या भूमिकेत उषा नाडकर्णी दिसणार आहेत. माईंच्या चुलत सासूला अक्षयचे कियारासोबत दुसरे लग्न झाले हे माहित नाही. त्यामुळे आता अक्षय आणि अमृता पुन्हा एकत्र येणार का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे. घाडगे सदनात अमृता सौभाग्यवतीसारखी मंगळसूत्र व साडीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मकरसंक्रात अमृता साजरी करणार की कियारा हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘घाडगे & सून’ या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत चिन्मय उद्गीरकर अक्षयची तर भाग्यश्री लिमये अमृताची भूमिका साकारत आहेत तर माईच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णी आहेत.  उषा नाडकर्णी यांच्या एंट्रीमुळे घाडगे & सून मालिकेत ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Comments

More in News

To Top