Connect with us

मराठी कलाकार

मुक्ता बर्वेला प्रेरणास्थान मानते “हि”आघाडीची अभिनेत्री.पहा बंदिशाळा सिनेमाचा ट्रेलर.

News

मुक्ता बर्वेला प्रेरणास्थान मानते “हि”आघाडीची अभिनेत्री.पहा बंदिशाळा सिनेमाचा ट्रेलर.

नुकताच अभिनेत्री वैदही परशुरामीने मुक्ता बर्वेसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आणि त्यात तिने चक्क मुक्ता बर्वेला वैदही प्रेरणास्थानी मानत असल्याचे तिने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे. मुक्ता नुकतीच वेडिंगचा शिनेमामध्ये दिसली होती. यात मुक्ताने उर्वी नावाची भूमिका साकारली होती. मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती घडतंय बिघडतंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली आहे.

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. वैदहीबाबत बोलायचे झाले तर तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती ‘वजीर’ सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.

आणि मुक्ताचा “बंदिशाळा” सिनेमाचा ट्रेलर नुकताच चाहत्यांच्या भेटीस आलेला असून त्यातून मुक्त बर्वेचा धडाकेबाज अंदाज चाहत्यांना बघायला मिळत आहे. मुक्ता बर्वैच्या भूमिकांमध्ये नेहमीच विविध छटा आणि वैविध्य प्रेक्षकांना पाहायला मिळालंय, ‘बंदीशाळा’मधील हीसुध्दा एक आव्हानात्मकच भूमिकाच आहे. त्यामुळे सिनेमाबाबत कुतुहूल निर्माण झालं आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ आणि ‘वेडिंगचा शिनमा’च्या जबरदस्त यशानंतर आता हा तिचा आगामी सिनेमा येतोय. तसंच नुकतीच विक्रम फडणवीसच्या ‘स्माईल प्लीज’ या मराठी सिनेमातसुध्दा मुक्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत असल्याचं उलगडलं आहे.

Comments

More in News

To Top