Connect with us

मराठी कलाकार

घराबाहेर आल्यानंतर वैशाली म्हणते,”त्याला कधीच माफ करणार नाही!”

बिग बॉस मराठी

घराबाहेर आल्यानंतर वैशाली म्हणते,”त्याला कधीच माफ करणार नाही!”

बिग बॉसच्या घरात सदस्यांच वाईल्डकार्ड द्वारे येणं आणि एलिमिनेशनमुळे बाहेर जाण्याचा खेळ नेहमीचाच. अशाच एलिमिनेशनद्वारे घरामधून बाहेर पडलेल्या गायिका वैशाली म्हाडेने “आता मी या घरातून बाहेर जरी आले असले तरी मी त्याला कधीच माफ करणार नाही”, अशा शब्दात आपला संताप दर्शवला आहे. आता वैशालीच्या बोलण्याचा रोख थेट पराग कान्हेरेकडे होता हे बिग बॉस फॉलो करणाऱ्यांना आम्ही वेगळे सांगायला नको.

मुलीच्या आठवणीने व्याकूळ झालेली वैशाली एका मुलाखतीदरम्यान पाहायला मिळाली. ती म्हणाली, “गेल्या आठवड्यात माझ्या मुलीचा वाढदिवस होता. त्यावेळी मला तिची फार आठवण आली. कारण दर वाढदिवशी ती आजारी पडते. त्या दिवशी मी खूप एकटी होते. अभिजीत, वीणा आदींनी मला धीर दिला. पण त्या दिवशीपासून मला वाटू लागले की आता पुरे.. आता आपण या घरातून बाहेर यायला हवे. आता मी बाहेर आले याचा मला नक्कीच आनंद होतो आहे”.

“बिग बॉसने मला खूप चांगले अनुभव दिले. अनेक कलाकारांशी मला स्वत:ला जोडता आले. बिग बॉस तुम्हाला फक्त दीड तास दिसत होते. पण त्या पलिकडे जवळपास २२ तास आम्ही एकत्र होतो. त्यातून अनेक चांगले अनुभव मला मिळाले. उरला प्रश्न त्या एका घटनेचा. तर त्यामुळे मात्र मला खूपच मनस्ताप सहन करावा लागला”, असेही ती म्हणाली. यंदाच्या सीझनमध्ये वैशालीला खात्री वाटते ती शिव आणि अभिजीतबद्दल. त्या दोघांपेकी कुणीतरी एक जण बिग बॉसचा विजेता होईल असे वैशालीला वाटते.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top