Connect with us

मराठी कलाकार

ह्या बिगबॉस कन्टेस्टंटची मुलगी म्हणते”१सप्टेंबरला मम्माच्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”

बिग बॉस मराठी

ह्या बिगबॉस कन्टेस्टंटची मुलगी म्हणते”१सप्टेंबरला मम्माच्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”

बिग बॉसच्या घरात सध्या गायिका वैशाली माडेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. बिग बॉसच्या घरातली ती एक स्ट्राँग कंटेस्टंट आहे. दरम्यान वैशालीच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला आहे. आपल्या मुलीचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा करणारी वैशाली यंदा मात्र आपल्या मुलीसोबत वाढदिवसाच्या दिवशी नसणार आहे.

वैशालीच्या मुलीने तिच्यासाठी यावर एक मेसेज रेकॉर्ड केला आहे. आस्था म्हणते, ‘माझे आजवरचे वाढदिवस दिमाखदार पध्दतीने साजरे व्हावेत आणि ते मेमरेबल असावेत, यासाठी माझी आई दरवर्षी खुप छान नियोजन करायची. वाढदिवसाच्यावेळी कोणतेही शो किंवा रेकॉर्डिंग न ठेवता ती माझ्यासोबतच टाइम स्पेंड करायची. यंदा मात्र मी मम्माला खूप मिस करेन. पण मम्मा तू माझी काळजी करू नको. आजी यंदा माझा वाढदिवस साजरा करणार आहे. तू असंच चांगलं खेळत रहा. स्ट्राँग रहा आणि १ सप्टेंबरला मला तुझ्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”

जुलै महिना सुरू झाल्यावर वैशालीने यंदा आपण आस्थासोबत वाढदिवशी नसल्याची बिग बॉसमध्ये खंत व्यक्त केली होती. वैशाली म्हणाली होती, “आस्थाचा बर्थ डे मंथ आता सुरू झाला आहे. दरवर्षी न चुकता तिचा वाढदिवस मी साजरा करते. यंदा ती अकरा वर्षाची होणार. म्हणजे आता पुढच्या वर्षी माझी मुलगी टिनेजर होणार यावर खरं तर विश्वासच बसत नाही. अकरा वर्ष कशी गेली कळलंच नाही. असं वाटतंय, ही चिमुकली आता तर जन्माला आली होती. मी घरात असताना तिचा सतत मम्मा-मम्माचा घोष चालू असतो. आता यंदा ती कशी साजरा करेल तिचा वाढदिवस ?”

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top