Connect with us

मराठी कलाकार

विद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला “हा”आरोप.बिगबॉस मराठी-२

बिग बॉस मराठी

विद्याधर जोशी शिकतायंत सुरेखा पुणेकरांकडून लावणी तर अभिजित बिचुकलेंच्या पत्नीने केला “हा”आरोप.बिगबॉस मराठी-२

अनेक लोक एकत्र आले की भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच. त्यात बिग बॉसचे घर म्हटले की हे स्वाभाविकच आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजणे, त्यांच्या सवयी समजून घ्यायला वेळ लागतोच. मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचे घरामध्ये तसे चांगले जमत होते. पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसत आहेत. आणि हा वाद देखील अभिजीत बिचुकले वरून.

अभिजीत बिचुकलेची पत्नी अलंकृता बिचकुलेने टाईम्स ऑफ इंडिया ऑनलाईनशी बोलताना तिची ही खंत मांडली आहे. तिने म्हटले आहे की, “माझे पती आणि बिग बॉस मराठी या घरातील सदस्य यांची पार्श्वभूमी खूपच वेगळी आहे. त्यामुळे इतर सेलिब्रेटींना त्यांना समजून घेणे कठीण जात आहेत. मी बिग बॉस मराठी हा कार्यक्रम न चुकता पाहते. तो पाहाताना मला वाटत आहे की, सगळे मिळून त्यांना लक्ष्य करत आहेत. या सगळ्यात ते एकटे पडले आहेत. माझे पती हे प्रचंड हुशार आहेत. पण येथील सेलिब्रेटींना त्याची जाणच नाहीये.”

abhijit kelkarया सगळ्यामध्ये बिग बॉसनी सदस्यांसाठी खूपच इंट्रेस्टींग टास्क दिले आहेत. सदस्यांमध्ये सध्या सवाल ऐरणीचा हा टास्क रंगत आहे. सुरेखा पुणेकर – विद्याधर जोशी, किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांच्यामध्ये सवाल ऐरणीचा हा टास्क रंगणार आहे.ज्यामध्ये, या चौघांना बिग बॉस एक अनोखं आव्हानं देणार आहेत. बिग बॉस नेहेमीच सदस्यांना नवनवीन टास्क देतात, हे आव्हानं देखील तितकच वेगळ आणि कठीण असणार आहे. विद्याधर जोशींना सुरेखा पुणेकर यांच्या वेशात तर सुरेखा पुणेकर यांनी विद्याधर जोशी यांच्या वेशात घरात वावरायचे आहे हाच नियम किशोरी शहाणे – अभिजित केळकर यांना देखील लागू पडणार आहे. याच बरोबर दिलेल्या गाण्यावर नृत्य देखील सादर करायचे आहे.हे बघायला गंमत येणार हे नक्की !

हाच टास्क पूर्ण करण्यासाठी विध्याधर जोशी यांनी नऊवारी साडी नेसली असून सुरेखा ताईं विद्याधर यांना या रावजी ही लावणी शिकवणार आहे. तर किशोरी शहाणे अभिजित केळकरला अशीही बनवा बनवी या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य शिकवणार आहेत.अभिजित केळकर मुलीची लुक मध्ये खूपच सुंदर दिसत आहे असं म्हणायला हरकत नाही… या टास्कमुळे घरातील वातावरण थोडं हलकफुलकं होईल यात शंका नाही.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top