Connect with us

मराठी कलाकार

मराठमोळ्या युवकाने मारली सातासमुद्रापार बाजी। ऑस्कर पुरस्कार। लॉस अँजेलिस सोहळा

vikas-sathye

News

मराठमोळ्या युवकाने मारली सातासमुद्रापार बाजी। ऑस्कर पुरस्कार। लॉस अँजेलिस सोहळा

ऑस्कर पुरस्कार हा सिनेसृष्टीत काम करणाऱ्या लोकांसाठी एक दिव्य स्वप्नच असते. भले हि तो मग अभिनेता, अभिनेत्री, दिगदर्शक किंवा टेक्निकल डिपार्टमेंटमधला का कोणी असेना. पण हाच मनाचा ऑस्कर पुरस्कार जिंकण्याचं कर्तब केलय ते एका मराठमोळ्या युवकाने. हा पुरस्कार मिळालाय विकास साठे ह्यांना. ‘के१ शॉटओव्हर’ ह्या कॅमेऱ्याची निर्मिती करण्यात मोठा वाटा विकास साठे यांनीही उचलला आहे. आपण दादासाहेब फाळके ह्यांची सिनेमॅटिक कॅमेऱ्याचं देशी तंत्रज्ञान गवसत बसणाऱ्या कथेबद्दल निर्मित ‘हरिश्चन्द्रची फॅक्टरी’ हा सिनेमा पहिलाच असेल. अगदी त्याच प्रकारे ‘के१ शॉटओव्हर’ हा सुस्पष्ट छायाचित्रण करणारा कॅमेऱ्याची निर्मिती करणाऱ्या विकास साठे यांची सुद्धा धडपड राहिली आणि त्यांनी ते करून दाखवलं सुद्धा!

विकास साठे ह्यांना मिळालेल्या पुरस्कारानं भारताची मान ताठ झाली आहे. विकास साठे ह्यांचा जन्म पुण्यातला. नंतरच शिक्षण मुंबईत झालं. अभियांत्रिकीला शिकवत असताना त्यांना इटलीला जाण्याची संधी चालून अली आणि मग विकास ह्यांच्यासमोरचे तंत्रज्ञानातले नवे नवे दरवाजे उघडत गेले. आणि आज नव्वदव्या ऑस्कर अकेडमी अवॊर्डच्या ‘सायंटिफिक अँड टेक्निकल’ पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. अमेरिकेतल्या लॉस अँजेलिस येथे हा सोहळा पार पडला. निवड समितीने साठे ह्यांच्यासोबतच या कॅमेर्यावरती काम करणाऱ्या टिमची निवड केली. ब्रॅड हरडेल, शेन बकहॅम, आणि जॉन कायल हे या टिमचे सदस्य आहेत.

Comments
Continue Reading
Advertisement
You may also like...

More in News

To Top