Connect with us

मराठी कलाकार

विक्रांत आणि ईशाच्या लग्नसोहळ्याची पत्रिका तब्बल दीड लाखांची!पहा व्हीडिओ.

Television

विक्रांत आणि ईशाच्या लग्नसोहळ्याची पत्रिका तब्बल दीड लाखांची!पहा व्हीडिओ.

अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार ही वेगळी आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळली आणि यामुळेच कदाचित ‘तुला पाहते रे’ ही झी मराठी वाहिनीवर नुकतीच सुरू झालेली मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या जोडीवर आणि मालिकेतील अन्य कलाकारांवरही उभ्या महाराष्ट्राने भरभरुन प्रेम केले आहे. सध्या या मालिकेत इशा आणि विक्रांतच्या म्हणजेच ‘विकीशा’च्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. या दोघांचा विवाहसोहळा विक्रांत सरंजामे यांच्या स्टेटसला शोभेल असाच विवाह सोहळा रंगणार आहे यात काहीच शंका नाही.

नुकतीच इशा आणि विक्रांतच्या लग्नाची आगळ्या वेगळ्या लग्नपत्रिकेची झलकही रसिकांना पाहायला मिळाली. हि पत्रिका चांदीच्या पत्र्यावर कोरलेली आहे. पत्रिकेसोबत एक सोन्याचा गणपती, चांदीचा करंडा, अत्तरदाणी, दिवा आणि मोती आहेत. ही एक लग्न पत्रिका १.५ लाखांची आहे. आता आमंत्रण जर इतकं शाही असेल तर विवाह सोहळा किती भव्य असेल याची कल्पना देखील आपण करू शकतो. विक्रांतने ईशाला लग्नाची मागणीदेखील एका वेगळ्या आणि शाही पद्धतीने घातली होती.

लग्नाच्या आधी मोठ्या प्रमाणावर संगीत रंगणार आहे. या संगीत सोहळ्यात सरंजामे कुटुंब वेगवेगळ्या गाण्यावर थिरकणार आहेत. विशेष म्हणजे आईसाहेब आणि जयदीप हे ‘नाळ’ चित्रपटातील गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसणार आहेत. तर विक्रांत आणि इशाचाही खास परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे. तेव्हा ईशा आणि विक्रांत म्हणजेच विकिशा यांच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा अनुभवायला आणि या नवं दाम्पत्याला आपले शुभाशीर्वाद द्यायला लग्नाचा मुहूर्त चुकवू नका १३ जानेवारी संध्याकाळी ७ वाजता फक्त  झी मराठीवर.

Comments
Continue Reading
You may also like...

More in Television

To Top