Connect with us

मराठी कलाकार

ईशा संकटात!”हा”नवा कट रचतोय विक्रांत सरंजामे.

Television

ईशा संकटात!”हा”नवा कट रचतोय विक्रांत सरंजामे.

सामान्य घरातील ईशा निमकर सरंजामे कुटुंबात लग्न करून आली आणि ती या घरात हळूहळू रुळते आहे. सगळे सुरळीत चालू असताना आता मालिकेत एक रंजक वळण आले आहे. विक्रांत सरंजामेचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला आहे. मात्र विक्रांतचा स्वभाव प्रेक्षकांना संभ्रमात टाकतो आहे. मालिकेत हा नवीन ट्विस्ट आल्यामुळे या मालिकेबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीन वाढली आहे.

प्रत्यक्षात विक्रांत सरंजामेचे ईशावर प्रेम नसून त्याने प्रॉपर्टी बळकावण्यासाठी ईशाशी लग्न केल्याचे समोर येते. तो त्या भागात झेंडेंना सर्व प्लान समजावून सांगताना दिसतो. विक्रांतच्या नव्या प्लानमध्ये तो सरंजामे कुटुंबाला ईशा हीच राजनंदिनी असल्याचे भासविणार आहे आणि घरातल्यांचा त्यावर विश्वास बसल्यानंतर आईसाहेब त्यांची सर्व संपत्ती ईशाच्या नावावर करतील आणि मग ईशा विक्रांत सरांच्या नावावर संपत्ती करेल. असा कट विक्रांतने आखला आहे. आता यात विक्रांत यशस्वी ठरेल की त्याचा हा खरा चेहरा ईशा व आईसाहेबांसमोर येईल का, हे आगामी भागात स्पष्ट होईल.

Comments

More in Television

To Top