Connect with us

मराठी कलाकार

विक्रांत सरंजामेच खरा व्हिलन?तुला पाहते रे मालिकेत मोठा ट्विस्ट.

Television

विक्रांत सरंजामेच खरा व्हिलन?तुला पाहते रे मालिकेत मोठा ट्विस्ट.

विक्रांत सरंजामे आणि ईशाची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूपच भावली आणि अल्पावधीतच ‘तुला पाहते रे’ ही मालिका यशाच्या शिखरावर पोहोचली. या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यामागचं कारण म्हणजे मालिकेचं हटके कथानक. पण येत्या काही दिवसांत मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मालिकेतील जालिंदरची व्यक्तिरेखा वेगवेगळ्या पद्धतीने ईशाला वेळोवेळी सावध करताना प्रेक्षकांनी पाहिले आहे. मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यामुळे जालिंदरच्या म्हणण्यात तथ्य आहे की काय अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण होणार आहे.

सरंजामे कुटुंबात सामान्य घरातील ईशा लग्न करून आली आणि ती या घरात हळूहळू रुळते आहे. सगळे सुरळीत चालू असताना आता मालिकेत एक रंजक वळण येणार आहे. मालिकेच्या नुकताच एका रिलीझ झालेल्या प्रोमोमध्ये विक्रांतचा एक वेगळाच चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला आहे. विक्रांतने त्याच्या स्वार्थासाठी ईशाशी लग्न केल्याचे समोर येत असून, विक्रांतने असे का केलं? त्याच्या अशा वागण्याचे कारण काय आहे? या सगळ्यामागे त्याचा स्वार्थ काय आहे? या सर्व प्रश्नांचा उलगडा मालिकेच्या येत्या काही भागात होणार आहे.

इशासोबत लग्न का केलं यामागचं खरं कारण विक्रांत सांगणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता हे कथानक पाहायला मिळणार आहे.
सुबोध भावे, गायत्री दातार यांची ‘तुला पाहते रे’ मालिका टीआरपी रेटिंग्जमध्ये वरच्या क्रमांकावर आहे. शिवाय, प्रेक्षकही मालिकेला भरभरून प्रतिसाद देत आहेत.

Comments

More in Television

To Top