Connect with us

मराठी कलाकार

बरेच दिवस सिनेमापासून दूर असणारा विनीत सध्या “हे” करतोय.वाचा अधिक बातमी.

Actor

बरेच दिवस सिनेमापासून दूर असणारा विनीत सध्या “हे” करतोय.वाचा अधिक बातमी.

अभिनेता विनीत भोंडेचे ‘चला हवा येऊ द्या’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात पदार्पण झाले, अगदी अचानक आणि दर एपिसोडगणिक! कधी हवालदार म्हणून, तर कधी लहान मुलगा म्हणून तो कोर्टात हजर होत राहिला.‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ असेच त्याच्याबद्दल बोलावे लागेल. त्यानंतर तो ‘बिग बॉस’ मध्ये दिसला. तिथे त्याने सगळ्यांची मने जिंकून घेतली. पहिली कॅप्टनकी देखील अनुभवली. ‘बिग बॉस’ नंतर तो सध्या काय करतोय? असा प्रश्न प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून पडत आहे.चला तर मग जाणून घेऊया सध्या विनीत काय करतोय?

काव्या ड्रीम मुव्हीज निर्मित ‘कळस’ या चित्रपटाच्या तयारीत विनीत सध्या व्यस्त आहे. या चित्रपटात १९८३ ते १९८५ या काळातली गोष्ट दाखवण्यात येणार असून या चित्रपटातील महत्वपूर्ण भूमिकेत विनीत दिसणार आहे. नुकतेच विनीतने या सिनेमाचे संपूर्ण कथानक वाचले असून या सिनेमाला होकार दिला आहे. या सिनेमात तो ‘धर्मा’ या महत्वपूर्ण भूमिकेत रसिकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत विनीत म्हणतो, ‘मी चांगल्या सिनेमाच्या शोधात होतो. त्यावेळी या चित्रपटाचे लेखक आशिष निनगुरकर, दिग्दर्शक रोहन सातघरे आणि कॅमेरामन योगेश अंधारे यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी ‘कळस’ या सिनेमाची गोष्ट मला ऐकवली. ती गोष्ट ऐकून मी काही काळ सुन्न झालो. हतबल झालो आणि हा सिनेमा माझ्यासाठीच आहे असे मला वाटले. आजच्या समाज व्यवस्थेवर फेकलेला हा ओरखडा आणि वस्तूस्थिती मला या सिनेमात दिसली. मी या सिनेमातील माझ्या पात्राच्या प्रेमात पडलो आणि या भूमिकेसाठी तत्काळ तयारी सुरु केली.”

कायमच विनोदी भूमिका करणारा विनीत या सिनेमातून एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून आपल्या भेटीला येणार आहे. लवकरच या सिनेमाचे चित्रीकरण सुरु होणार असून इतर कलाकारांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यात या सिनेमाचे चित्रीकरण होणार आहे.

Comments

More in Actor

Like Us on Facebook

Popular Posts

To Top