Connect with us

मराठी कलाकार

बिगबॉसच्या घरात हिंसा! शिवानी आणि वीणा ठरणार अपात्र?

बिग बॉस मराठी

बिगबॉसच्या घरात हिंसा! शिवानी आणि वीणा ठरणार अपात्र?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर बाजार हे साप्ताहिक कार्य कालच संपले या, टास्क दरम्यान घरामध्ये खूप क्लेश, हातापायी आणि भांडण झाली. सदस्यांनी एकमेकांचे कपडे, सामान उधळून लावले. प्रत्येक सदस्य आपल्या टीमला टास्क मध्ये जिंकवण्याच्या मागे होता. परंतु यामध्ये सदस्य बिग बॉसच्या घराच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसले. वेळोवेळी बिग बॉस यांनी ताकीद देऊन देखील पूर्ण टास्क मध्ये सदस्यांनी हे सुरूच ठेवले. समंजस आणि सुज्ञ सदस्यांकडून अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन होणे अनपेक्षित आहे. याच चोर बाजार या टास्क दरम्यान काल शिवानी आणि वीणामध्ये शाब्दिक चकमकी बरोबरच एकमेकांवर त्यांनी हात देखील उचलले.

बिग बॉसच्या घरातील नियमांची पूर्णपणे कल्पना असूनही या दोघींनी हिंसक कृत्य या टास्क दरम्यान केले. या दोघींनी नियम तोडले आणि त्याचे समर्थन देखील केले. अशा वागण्यातून या दोघींची अखेळाडू वृत्ती दिसून येते आणि अशा प्रकारची हिंसा सुज्ञपणाच्या व्याख्येत मोडत नाही असे बिग बॉस यांनी दोघींनाही निक्षून सांगितले. अशा प्रकारच्या कोणत्याही घटना बिग बॉसच्या घरात घडू नये अथवा अशा घटना घडण्यासाठी त्याला चालना मिळू नये म्हणून बिग बॉसनी याससंदर्भात कठोर निर्णय सुनावला. आणि तो म्हणजे शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात रहाण्यास अपात्र आहेत. बिग बॉस च्या या निर्णयाने सगळ्या सदस्यांन आश्चर्याचा धक्का बसला आहे.

का बसला किशोरी शहानेंना शॉक?

तर दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्‍टीची प्रख्‍यात अभिनेत्री किशोरी शहानेंनी कालच्‍या ‘चोर बाजार’ टास्‍कनंतर सर्वांची मने जिंकली आहेत. वूटच्‍या ‘अनसीन अनदेखा’च्‍या नवीन क्लिपमध्‍ये मोहकता व उत्‍तम अभिनय कौशल्‍यांसाठी ओळखली जाणारी किशोरी तिचे सह-स्‍पर्धक पराग कान्‍हेरे व वीणा जगतापसोबत बिग बॉस घरामध्‍ये प्रवेश करण्‍याबाबत प्रांजळपणे बोलताना दिसत आहे. तिघेही बागेमध्‍ये गप्‍पागोष्‍टी करताना दिसत आहेत. पराग किशोरीला ‘बिग बॉस सीजन २’साठी विचारल्‍यानंतर तिच्‍या प्रतिक्रियेबाबत विचारतो. शहाणे लगेच प्रतिक्रिया देत म्हणाल्या, ”मला मेसेज आला की, आर यू इंटरेस्‍टेड इन बीकमिंग ए कन्‍टेस्‍टण्‍ट इन बिग बॉस?, आणि मी सरप्राइज होते की मला विचारतात आहे!’‘ त्‍यानंतर त्या मनापासून हसताना दिसतात.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top