Connect with us

व्हॅलेंटाईन्स वीक स्पेशल। वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे। अपकमिंग सिनेमा What’s up लग्न।

whatsup-lagna-marathi-movie

News

व्हॅलेंटाईन्स वीक स्पेशल। वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे। अपकमिंग सिनेमा What’s up लग्न।

व्हॅलेंटाइन्स डे म्हटलं म्हणजे एक प्रिय व्यक्ती, मग तो दिवस तिच्यासाठीच प्लॅन करायचा. तिच्यासोबत कुठेतरी रोमँटिक वातावरणात हिंडायला जायचं. संध्याकाळी सोबत कॉफी, त्या व्यक्तीला भेटवस्तू, चॉकलेट्स, गुलाब वगैरे वगैरे. आता याच व्हॅलेंटाईन्स वीक च्या धर्तीवर वैभव तत्ववादी आणी प्रार्थना बेहरे हि जोडी त्यांच्या अपकमिंग मराठी सिनेमा ‘What’s up लग्न’ चं प्रमोशन करतांना दिसणार आहे. वैभव आणी प्रार्थनाची ऑनस्क्रीन केमिस्ट्री फॅन्सना चांगलीच आवडली होती. या दोघांनी आधीच ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ सिनेमात काम केलेलं आहे. तिथुनच हि जोडी हिट ठरली होती आणी आता ह्या ‘what’s up लग्न’ मध्ये हे दोघे मुख्य भुमिकेत आहेत.

व्हीडिओ पॅलेस आणि जाई जोशी प्रस्तुत हा चित्रपट आहे. निर्मिती आणि दिगदर्शनाची धुरा विश्वास जोशी सांभाळत असून हा चित्रपट १६ मार्चला प्रदर्शित होतं असल्याचं समजतंय. ‘कॉफी आणि बरंच काही’ ह्या सिनेमानंतर दोघांची फॅन फॉलोविंग झपाट्याने वाढली आहे. प्रार्थनाला तर नेहमीच ‘कॉफी आणि बरंच काही’ च्या सिक्वेल बाबत चाहत्यांकडून विचारलं जाते. त्यामुळेच कि काय वैभवने काही दिवसांपूर्वी चाहत्यांची वैभव आणि प्रार्थनाला सोबत पाहण्याची इच्छा लवकरच पूर्ण होत असल्याबाबत ट्विटरवर ट्वीट करून सगळ्यांना सांगितलं होतं.

‘फिनक्राफ्ट मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट प्रा. लिमिटेड’ या बॅनरखाली बनत असलेल्या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लॉन्च झालं आहे. व्हॅलेंटाईन्सच्या या मोसमात ‘क्षणभर विश्रांती’ घेऊन परत येणाऱ्या या जोडीच्या ‘what’s up लग्न’ मध्ये काय दडलंय हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आपल्याला दिसेलच तोवर आपणही व्हॅलेंटाईन्स वीक साजरा करूया नाही का?

Comments

comments

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

More in News

Like Us on Facebook

Advertisement

Popular Posts

To Top