Connect with us

मराठी कलाकार

“ह्या” बिगबॉस मराठीच्या सदस्याची ‘ये रे ये रे पैसा ३’मध्ये वर्णी!

बिग बॉस मराठी

“ह्या” बिगबॉस मराठीच्या सदस्याची ‘ये रे ये रे पैसा ३’मध्ये वर्णी!

‘ये रे ये रे पैसा २’ हा शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार आणि स्मिता गोंदकर हे कलाकार आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भुरळ घालतो की नाही हे येत्या काळाच कळेलंच पण दुसरीकडे काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात ‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटातील कलाकरांनी प्रवेश केला होता.

यावेळी ‘ये रे ये रे पैसा २’च्या कलाकारांनी बिग बॉसच्या घरातील सदस्यांना एक सरप्राईज दिलं. नेहा शितोळे ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मोठ्या पडद्यावरुन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस २’ च्या घरात ज्या व्यक्तींपासून भांडणाची सुरुवात झाली ती म्हणजे नेहा शितोळे. या सिझनमधील प्रसिद्ध अशी स्पर्धक नेहा आहे. नेहाच्या खरेपणामुळे आणि खेळण्याच्या रणनीति पद्धतीमुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.

‘बिग बॉसनं आमचं छान स्वागत केलं त्यामुळं आम्ही बिग बॉसच्या या सदस्यांपैकी एका सदस्याला ‘ये रे ये रे पैसा’च्या तिसऱ्या भागात काम करण्याची संधी देत आहोत’, असं ‘ये रे ये रे पैसा २’च्या कलाकारांनी जाहीर केलं. त्यादरम्यान प्रसाद ओकनं स्पर्धकांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘ये रे ये रे पैसा’च्या तिसऱ्या भागात नेहा शितोळेची निवड झाल्याचं प्रसाद ओकनं जाहीर केलं.

Comments

More in बिग बॉस मराठी

Like Us on Facebook

Popular Posts

To Top