Connect with us

मराठी कलाकार

फँटम फिल्म्स आता मराठी सिनेसृष्टीत। आगामी यंग्राड सिनेमाद्वारे पदार्पण

Youngraad Marathi Cinema Poster

News

फँटम फिल्म्स आता मराठी सिनेसृष्टीत। आगामी यंग्राड सिनेमाद्वारे पदार्पण

“यंग्राड” ह्या शब्दाचा अर्थ म्हणजे उनाड मुलगा! आणि अशाच चार उनाड मित्राची कथा घेऊन आपल्या भेटीला आगामी यंग्राड सिनेमा येत आहे. उगाच भांडण उकरून काढणं, स्वप्नसुंदरी सोबत आपल्या मित्रच सूत जुळवन्यासाठी त्याला ना ना प्रकारे मदत करणं असे हे ४ मित्र. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार मित्र नेहमी अडचणीत सापडतात. आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्याचच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वाचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात. अशा एका वेगळ्या धाटणीचा हा यंग्राड सिनेमा आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले असून त्यात चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ आणि जीवन कराळकर या चार युवकांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत.

Youngraad Marathi Cinema Poster

फँटम फिल्म्सने मराठी चित्रपटनिर्मिती क्षेत्रात “यंग्राड’’च्या माध्यमातून पाऊल ठेवले आहे. चित्रपटाचे लेखन मकरंद माने यांनी केले असून त्यांनी या चित्रपटाची पटकथा शशांक शेंडे आणि अझीझ मदारी यांच्यासह लिहिली आहे. चित्रपटात चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, शिरीन पाटील, मोनिका चौधरी, शशांक शेंडे, जीवन कराळकर, विठ्ठल पाटील, शंतनू गणगणे, सविता प्रभुणे आणि शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चार कुमारवयीन युवकांची ही कथा त्यांच्या चुकांमधून ते आयुष्याचे धडे कसे गिरवीत जातात, याविषयीची आहे. मराठी चित्रपटात कथा खूपच दमदार असतात आणि ही दमदार कथानके उलगडण्यासाठी भक्कम अशी अभिनेत्यांची फळी येथे उपलब्ध आहे. हे सर्व आमच्या प्रेक्षकांना देताना आम्हाला खूपच अभिमान वाटतो आहे,” असे उद्गार ह्यावेळी फँटम फिल्म्सच्या मधु मंटेना यांनी काढले. चित्रपट ६ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील मोठ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Continue Reading
You may also like...

More in News

To Top