Connect with us

मराठी कलाकार

झी मराठी अवॉर्ड्स २०१८पुरस्कार सोहळा पडला पार. पहा पुरस्कारांची यादी

News

झी मराठी अवॉर्ड्स २०१८पुरस्कार सोहळा पडला पार. पहा पुरस्कारांची यादी

झी मराठी अॅवॉर्ड्स म्हणजे झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा. रविवारी सायंकाळी झी मराठी अवॉर्ड 2018 हा सोहळा पार पडला. अनेक कलाकारांना या सोहळ्यात पुरस्कार मिळाले असून सध्या बऱ्याच लोकप्रिय झालेल्या “तुला पाहते रे’ या मालिकेला 9 पुरस्कार मिळाले तर ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेला 5 पुरस्कार मिळाले आहेत.

प्रेक्षकांनी भरभरून मत दिलेले त्यांचे लाडके कलाकार ह्या सोहळ्यात विजयी ठरले. विनोदी स्किटस्, दिलखेचक परफॉरमन्स,आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला होता. अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:-

सर्वोत्कृष्ट नायिका – राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट नायक – विक्रांत सरंजामे (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट मालिका – तुला पाहते रे
र्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) – ईशाचे वडील (तुला पाहते रे)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (महिला) – राधिका (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम – चला हवा येऊ द्या
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक – संकर्षण कऱ्हाडे (आम्ही सारे खवय्ये)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – लाडू (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट खलनायक – हर्षवर्धन (लगीरं झालं जी)

Continue Reading
Advertisement
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in News

To Top