Connect with us

मराठी कलाकार

“झी टॉकीज कॉमेडी अवोर्डस”मधील रिंकूच्या परफॉर्मन्सची खास झलक.पहा व्हीडिओ.

Featured

“झी टॉकीज कॉमेडी अवोर्डस”मधील रिंकूच्या परफॉर्मन्सची खास झलक.पहा व्हीडिओ.

‘सैराट’ सिनेमा सुपरडुपर हिट झाला. ज्यांनी आयुष्यात कधी अॅक्टिंग केली नव्हती त्यांना घेऊन नागराज मंजुळेने चित्रपट बनवला. त्या मुलांना मिळालेली लोकप्रियता हे सांगायची गरज नाही. ‘सैराट’ सिनेमानंतर रिंकू राजगुरु हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर ‘सैराट’ या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. नुकत्याच पार पडलेल्या झी टॉकिजच्या कॉमेडी पुरस्कार सोहळ्यात रिंकु परफॉर्मन्स करणार आहे.

झी टॉकीजनं त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रिंकूच्या या परफॉर्मन्सची झलक शेअर केली आहे. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सने रिंकू करणार प्रत्येकालाच घायाळ. रिंकूच्या या परफॉर्मन्सच्या तयारीची ही एक झलक. आपल्याला ‘झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स’ रविवार २८ जुलै, संध्या ६:३० वा. आपल्या झी टॉकीजवर बघायला मिळणार आहे.

रिंकू राजगुरूच्या मेकअप या आगामी चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. टीजरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडताना दिसत असून या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीचीच भूमिका साकारत असल्याचे हा टीजर पाहून आपल्या लक्षात येत आहे. काही दिवसांपूर्वी रिंकू ‘मेकअप’ सिनेमातील मानधनामुळे चर्चेत आली होती. रिंकूने मेकअपसाठी तब्बल २७ लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे.

 

Comments

More in Featured

Like Us on Facebook

Popular Posts

To Top